पिंपरी- भाविकांचा महापूर हरिनामाचा जयघोष, गुढ्या, रांगोळीच्या पायघड्यांनी संत तुकारामनगरी रिंगण सोहळ्यासाठी सजली होती. शहरात आज सकाळपासूनच रिंगणाचा ’फिव्हर’ चढला होता.
गेल्या काही दिवसांपासूनच पिंपरी-चिंचवडकरांमध्ये रिंगण सोहळ्याबद्दल जिथे तिथे चर्चा रंगली होती. आज प्रत्यक्षात या सोहळ्याला संत तुकारामनगरमधील एचए मैदानावर सुरुवात झाली. पिंपरीचिंचवड महापालिकेच्या वतीने या सोहळ्याचे अगदी चोख नियोजन झाले होते. शहरातील पहिलेच रिंगण असल्याने प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहचली होती. लाखो भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. त्यामध्ये अगदी पुण्याबाहेरूनसुध्दा आलेल्य भाविकांचा सहभाग होता.
रिंगण सोहळा सुरु होण्याआधीच लोकांनी मैदानावर गर्दी केली होती. शहरातील पालखीच्या आगमनामुळे काही शाळांना सुट्ट्या दिल्या होत्या. त्यामुळे लहान मुलांची उपस्थिती सुध्दा लक्षणीय होती. जिथे जागा मिळेल तिथे लोक ठाण मांडून बसले होते. झाडांवर, बिल्डिंगच्या टेरेसवर, घरांच्या छपरावर, टेरेसवरील टाक्यांवर, कपाऊंडवर, दिंडी घेऊन आलेल्या ट्रकवर ते अगदी पालिकेच्या वतीने केलेल्या स्टेजवरसुध्दा काही लोक चढले होते. रिंगण सोहळ्यात सुरुवातीला भगवे झेंडे, तुळशी, विणेकरी, हंडेवाल्या महिलांनी फेर धरला. शेवटी मोठ्या दिमाखात मानाच्या काळ्या पांढ-या एशांनी फे-या मारल्या. विद्युत वेगाने एशांनी फे-या मारायला सुरुवात केली अन् उपस्थित सर्वांनी अक्षरश: श्वास रोखून धरला होता. सोहळ्यानंतर प्रत्येक भाविक ’नाविण्यपूर्ण रिंगण सोहळा’ अशाच प्रतिक्रीया देत होते.
अवघे वातावरण विठ्ठलमय झाले होते. ग्यानबा तुकाराम असा जयघोष सगळ्यांच्या मुखात होता. सुरक्षेची व्यवस्था करणारे पोलिसही यावेळी लोकांना हा गजर म्हणण्याचे आवाहन करत होते. टाळ, मृदुंगाच्या गजराने संत तुकारामनगरी दुमदुमून गेली होती.
तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण पिंपरीत पार पडलं. यावर्षी अष्टमीची तिथी
दोनदा आल्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पिंपरी-चिंचवडमधील मुक्काम
दोन दिवसांचा राहणार आहे. हा योग दुग्धशर्करा व्हावा, यासाठी सोहळ्याचे यंदाचे
पहिले गोल रिंगण पिंपरीत व्हावे, अशी शहरवासियांनी मागणी केली होती. चर्चेनंतर
ही विनंती देहू देवस्थानने मान्य केल्यानंतर हे रिंगण पार पडलं.
पिंपरीतला हा नयमरम्य रिंगण सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी,
पुणेकरांनी अलोट गर्दी केली होती. पिंपरीच्या एच.ए.मैदानावर हा रिंगण सोहळा पार
पडला. तुकोबांच्या पालखीचा मुक्काम आज पिंपरीत आहे. पिंपरीत पहिल्यांदा पूर्ण
रिंगण सोहळा झाल्यानं भाविकांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. या पहिल्या
रिंगणाला मोठ्या प्रमाणात दिंड्यांची उपस्थिती होतीय यापूर्वी असं रिंगण
पुण्यात झालं होतं त्यावेळी भाविकांची सोय ही महापालिकेनं केली होती.
इथे फोटो पहा
https://www.facebook.com/media/set/?set=a.1790393441433.2091003.1287525197
No comments:
Post a Comment